Yashwantrao Chavan Gharkul Yojana in Marathi
Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2024 : नमस्कार, आपण आज या लेख मध्ये यशवंतराव चव्हाण घरकुल योजने बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपण बघतो की आपल्या आजु बाजुला किंवा भारत देशात विविध प्रकारचे जाती धर्म वाले लोक राहतात. आणि अनेक नागरिकां कडे स्वत:चे घर नाही आहे. या मध्ये बर्याच अशा जाती आणि प्रजाती आहे कि ज्या आजही आर्थिक आणि सामाजिक दृष्टया नी मागास आहे. तर हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार ने यशवंतराव चव्हाण घरकुल योजना सुरु केली आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेख मध्ये या योजने शी संबंधित सर्व आवश्यक माहिती देऊ. त्या करिता हा लेख शेवट पर्यंत वाचा, अशी विनंती आहे.
महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाना देखील हक्काचे पक्के घर मिळावे म्हणून महाराष्ट्र सरकार ने यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ची सुरुवात केली आहे. या योजने च्या अंतर्गत राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती मधील लोकांना हक्काचे घर मिळावे त्यांना समाजात मानाने जगता यावे आणि या समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना शामिल करुण घेता यावे असा या योजनेची दृष्टी आहेत. महाराष्ट्रातील इतर प्रवर्गातील कुटुंबाना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यातुन जसे की पीएम आवास योजना, शबरी आवास योजना इत्यादि च्या अंतर्गत स्वता:चे हक्काचे घर मिळत होते पण विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाना या योजने अंतर्गत घरकुल मिळत नाही म्हणून त्यांचा साठी अशी ही योजना राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्र च्या राज्या मध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र मिळून राहत असतात. जातीय वर्गीकरणा मुडे इतर प्रवर्गातील कुटुंबाना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेच्या माध्यातुन ही योजना सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दरवर्षी ३ गावांना दिला जातो. त्यातील २० कुटुंबाना या घरकुल योजनेच्या लाभ मिळतो. आजच्या काळात प्रत्येक कडे स्वत:चे घर दार असणे आवश्यक आहे तेव्हा त्याला इतर नागरिकां समोर हात पसरवण्याची गरज जाणवत नाही त्यामुळे अशा नागरिकांना सन्मान मिळवण्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी ठरते. (Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2024) या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे की राज्यामध्ये एकही नागरिक कच्चा घरामध्ये राहू नये व प्रत्येक नागरिकांकडे स्वता:चे घर असायला हवे.
योजने (Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2024) मध्ये अशा आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन पाऊल उचलून यशवंतराव चव्हाण घरकुल योजने ची सुरुवात केली आहे या योजने च्या अंतर्गत भटक्या जमातीतील नागरिकांना पक्की घर मोफत बांधून मिळते व त्यांना योग्य दर्जाचे घरकुल प्राप्त होते त्यामुळे कोणत्याही नागरिकाला झोपडी मध्ये किंवा कुठेही पाल टाकुन राहण्याची गरज भासत नाही तसेच त्यांचा ऊन, वारा, पाऊस या ऋतूमध्ये त्यांचा संरक्षण होतो. म्हणून या करता महाराष्ट्र शासनाने हा पाऊल घेतल आहे की त्यांना पक्के घर प्राप्त हो आणि त्यासाठी याच पूर्ण खर्च महाराष्ट्र शासनाने उचलला आहेत, आणि याच भावनेने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना २०२४
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना २०२४ ची यादी (Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2024)
महाराष्ट्र शासनाच्या माध्मातुन ही योजना सर्व लाभार्थ्यांची नावे ऑफिसियल वेबसाइट वर अपडेट करण्यात आली आहेत. जर तुम्हाला तुमचे नाव पत्ता सगळ यशवंतराव चव्हाण योजना २०२४ च्या लिस्ट मध्ये पहायचे असेल, तर तुम्हाला ऑफिसियल वेबसाइट वर जावे लागणार. किंवा आमच्या मार्फत दिलेल्या लिंक वर क्लिक करुण तुम्ही सुद्धा यशवंतराव चव्हाण घरकुल योजना २०२४ च्या लिस्ट मध्ये तुमचे नाव बघू शकता. ही योजना राज्या मधील विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील कुटुंबांना या योजनेच्या माध्यातुन घरे उपलब्ध करुण दिली जाणार आहेत.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना सुरु करण्याचा मुख्य हेतु काय आहे? २०२४
- राज्या मध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या परिवाराचा विकास करण्याचा हेतूने ही योजना २०२३ मध्ये शासना द्वारे सुरु करण्यात आली आहे.
- योजनेचा माध्यमातुन नागरिकांचे जीवन मध्ये सुधार होणे व त्यांचा मुल आणि मुलींचे शिक्षण पूर्ण करता येणार या करता योजनेचा मुख्य हेतु आहे.
- नागरिकांना शासनाच्या माध्यमातुन जमीन उपलब्ध करुण देऊन त्यांना चांगली सोय सुविधा करुण देणे व त्या ठिकाणी त्यांना आर्थिक दृष्टया करता सक्षम बनवणे इत्यादि शासनाचा हेतु आहे.
- महाराष्ट्रातील इतर प्रवर्गातील कुटुंबाना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यातुन जसे की पीएम आवास योजना, शबरी आवास योजना इत्यादि च्या अंतर्गत स्वता:चे हक्काचे घर मिळने पण या योजनेचा अत्यंत महत्वपूर्ण उद्देश आहे.
Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 चे उधिष्ट्ये
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना मध्ये उधिष्ट्ये सुरु करण्याचे अनेक प्रकार आहे, जे खाली स्पष्ट केले आहेत.
(१) शैक्षणिक प्रवाहात आणने किंवा शिक्षणची व्यवस्था
योजने च्या अंतर्गत ज्या नागरिकांचे कुटुंबाला बरोबर शिक्षण घेत नाही किंवा त्यांना शिक्षण प्राप्त होत नाही व त्यांचे पक्के घर नसल्यामुडे त्यांना आर्थिक परिस्थिति चा सामना करावे लागतात. सोबतच त्यांना रोजगार पण उपलब्ध होत नाही. त्या करता अशा समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणने, या योजनेचा उधिष्ट्ये आहे.
(२) रोजगार निर्मिती करण्यास प्रोत्साहन देणे
YCGY २०२४ च्या अंतर्गत ज्या नागरिकांना रोजगार प्राप्त करण्यात कठिनाई जात असते तर त्यांना रोजगार उपलब्ध करण्याचे प्रोत्साहन दिले जातात. सोबतच भटक्या आणि विमुक्त जातीतील कुटुंबाला जमीन आणि घर बांधून देणे ताकि या जामिनीवर हे कुटुंब आपले व्यवसाय सुरु करू शकते. आणि याच मुडे त्यांना रोजगार चे पर्याय उपलब्ध होणार.
(३) स्वतंत्र घर किंवा स्वताचे हक्काचे घर
या मध्ये पात्र असलेल्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकार तर्फे ५ गुंठे जमीन दिली जाते. तसेच त्या जमिनीवर २६९ चौरस फुट घर बांधून देणे या योजनेचा उधिष्ट्ये आहेत. या मध्ये जे व्यक्ति पात्र आहेत त्यांना सरकार द्वारे पक्के घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. मोदी आवास योजनेद्वारे राज्यातील तब्बल १० लाख कुटुंबाला पक्के घर देण्याचा उद्देश आहे.
(४) सामाजिक एकत्रीकरण / सामाजिक समावेश
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना मध्ये भटक्या आणि विमुक्त जमातीतील लोकांचे जीवन भटके आणि विना पक्क्या घर असल्यामुडे ते कधी एकाच ठिकाणी वस्ती करुण राहत नाही, किंवा त्यांचा कडे पक्के घर नसतात. तर अशा लोकांचे सामाजिक संपर्क फार कमी होतो.
(५) घरकुलासाठी किती पैसे मिळतात?
समाजाच्या लाभार्थांना सामूहिक रित्या, वैयक्तिकरित्या द्वारे योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा. डोंगराळ भागातील लाभार्थ्यासाठी १.३० लाख व सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थ्यासाठी १.२० लक्ष इतके अनुदान देण्यात येईल.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना मध्ये लाभ कोणाला घेता येतो? २०२४
योजने मध्ये असणारे विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करुण उपजीविका करणारे, झोपडी, कच्चे घर, पाल टाकुन राहणारे लोक आणि ते कुटुंब ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणार्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
या योजनेच्या अटी काय आहे? २०२४ (Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2024)
यशवंतराव चव्हाण घरकुल योजने मध्ये लाभार्थी विमुक्त जाती, भटक्या जमातील असावेत. लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे. किंवा लाभार्थी वर्षभरात किमान सहा महीने एका ठिकाणी राहत असावे तरच या योजनेचा लाभ त्या कुटुंबातील कोणत्याही एकाच व्यक्तीला देण्यात येतो. महत्वाचा म्हणजे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजेल.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे व पात्रता
या योजने करता लागणारे महत्वाची कागदपत्रे खाली सांगण्यात आलेले आहेत.
- आधार कार्ड
- जातिच प्रमाणपत्र
- राहण्याचा पत्ता
- वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट फोटो
- नागरिक महाराष्ट्र राज्याचा असावा.
- नागरिकां कडे पक्के घर नसावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखा पेक्षा जास्त नसावे.
Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2024 Online Registration Process
महाराष्ट्र राज्यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या इच्छुक असणारे लाभार्थी ज्यांना या योजने द्वारे स्वता:चे घर घेण्यासाठी अर्ज करायचे आहे, ते यशवंतराव चव्हाण घरकुल योजने च्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकते. लाभार्थ्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत केली जात असते. स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत तयार केलेली कायमस्वरूपी प्रतीक्षा लिस्ट स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सुचना द्वारे प्रसिद्ध केली जाते.
Yashwantrao Chavan Gharkul Yojana; How to Apply (अर्ज कसा करावा)
या योजने मध्ये अर्ज करण्या करिता ग्रामपंचायत आणि समाज कल्याण अधिकारी द्वारे अर्ज करू शकते. जे की खाली दोन्ही पद्धति ने सांगण्यात आले आहेत.
१) ग्रामपंचायत -: या मध्ये जे कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील ते आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संपर्क करू शकते आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचा कडे अर्जाची मागणी करावी. तुम्हाला ग्रामपंचायत अर्ज उपलब्ध करुण देईल. दिलेल्या अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. सोबतच आवश्यक कागदपत्रे ही जोडायचे आहे. शेवटी तो अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात द्यायचा आहे.
२) समाज कल्याण अधिकारी -: तुमच्या जवळच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात जाऊन अर्जाची मागणी करावी लागेल. त्यानंतर समाज कल्याण चे अधिकारी तुम्हाला अर्ज उपलब्ध करुण देईल. उपलब्ध झालेल्या अर्ज पूर्ण भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून त्या अधिकारी कडे द्यायचे आहे. अशा रितीने तुमच अर्ज समाज कल्याण अधिकारी च्या कार्यालयात जमा होईल.
Conclusion थोडक्यात
(Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2024) या योजने बद्दल सर्व माहिती तुम्हाला स्पष्ट सांगण्यात आली आहे. आशा करते की तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्याल व इतरांनाही या योजने बाबत कळवाल. अश्याच नवनवीन योजने करताकिंवा इतर माहिती करिता आमच्या ऑफिसियल पेज ला भेट देत रहा. धन्यवाद!!