Lek Ladaki Yojana
Lek Ladaki Yojana 2024 :- मित्रांनो आज आपण लेक लाडकी योजना बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहो. तर मित्रांनो लेक लाडकी योजना २०२४ ही सरकार द्वारे काढली गेलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कोण-कोणते लाभ मिळणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मा मध्ये प्रोत्साहित देऊन मुलींचा जन्मदर वाढवने, मुलींना शिक्षण मध्ये मदत करणे, मुलींच मृत्यु दर कमी करणे सोबतच त्यांच बालविवाह थांबवने आणि कुपोषण कमी करणे इत्यादि हे सगळे बदल करण्या करिता राज्यात ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
लेक लाडकी योजना २०२४ महाराष्ट्र मध्ये नेमकं ही योजना कोणी सुरु केली आहे. या योजनेचा काय फायदा आहे आणि या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो. आणि या योजनेचा फॉर्म कसा भरायचा. या योजने करता कोण-कोणते कागदपत्रे लागतात हे सर्व आपण येथे बघणार आहोत.
लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून राज्य शासन हे महाराष्ट्रातील मुलींसाठी एकुण १,०१,००० लाख रूपये ची आर्थिक सहाय्य करणार आहे. आणि या योजने मध्ये १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना एकुण ५ टप्यांमध्ये ही मदत केली जाणार आहे. पहिला टप्प्या मध्ये मुलींचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीना ५०००/- हजार रक्कम दिली जाणार आहे. गेल्या काही वर्षापासून लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे आणि महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ वर्ष मध्ये ही योजना ची घोषणा केली आहे. ही योजना महिल्यांचा आर्थिक समस्या करण्या करता महत्वपूर्व ठरणार आहेत. लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार, कोण या योजने करता पात्र राहील या सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
लेक लाडकी योजना २०२४ (Lek Ladaki Yojana 2024)
महाराष्ट्र सरकार ने लेक लाडकी योजना सुरु केली आहे. परंतु या योजनेच्या मुख्य उद्देश हे आहे की देशातील गरीब कुटुंबातील मुली त्यांचा जन्मापासून तर शिक्षण होई पर्यंत आर्थिक मदत करणे आहे. सोबतच त्यांचा विकास व्हावा हा सर्वात मोठा उद्देश या योजनेचा आहे. मुलींचा उज्जवल भविष्य करता लेक लाडकी योजना चा मोठा पाऊल उचलण्यात आला आहेत. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.
या योजने मध्ये मुलगी मोठी होई पर्यंतच योजनेचा लाभ मिळेल. या योजने चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे ची आवश्यकता आहे. ज्या पण मुलींला या योजनेच्या लाभ घ्यायचा आहे, त्या मुलीच जन्मदाखला, कुटुंबाच्या दाखला, आधारकार्ड, पाककांचं आधारकार्ड, बैंक पासबुक ची झेरोक्स, राशन कार्ड ची झेरोक्स इत्यादि कागदपत्रे या योजने करता अनिवार्य आहे.
(१) महाराष्ट्र मध्ये लेक लाडकी योजना ही राज्यातील सर्व मुलींकरता महाराष्ट्र शासनाची मुख्य योजना आहे.
(२) लेक लाडकी योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींना सक्षम करणे आणि त्यांचे मुलभुत शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे किंवा मदत करणे आहे.
(३) लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत ज्या कुटुंबाची मुलीं शिक्षण ग्रहण नाही करू शकत तर अशा कुटुंबाची मदत करण पण या योजनेचा उद्देश आहे.
(४) या योजने मध्ये मुलींला जन्मा पासून तर १८ वर्ष होईपर्यंत वेग-वेगडया चरणा मध्ये एकुण १ लाख १ हजार रूपये दिली जाणार. जर कोणाच्या घरी जूळवा मुलीं झाले तर त्या दोघांना याच लाभ घेता येईल.
लेक लाडकी योजना २०२४ ची आवश्यक / संपूर्ण माहिती (Lek Ladaki Yojana 2024)
- लेक लाडकी योजनेचे आर्थिक फायदे
- लेक लाडकी योजनाचे लाभ
- लेक लाडकी योजना २०२४ पात्रता व नियम
- लेक लाडकी योजनेचे आवश्यक कागदपत्रे
- लेक लाडकी योजना मध्ये नोंदणी कशी करावी
- या योजनेच्या लाभ घेण्यासाठी महत्वाची अटी
वर दिलेल्या लेक लाडकी योजना बद्दल आपण पुढे चर्चा करणार आहोत, त्या करिता पूर्ण लेख शेवट पर्यंत वाचा. आणि पुढे योजने चे काय फायदे आहे, काय लाभ आहे, कागदपत्रे कोणते आवश्यक आहे या सर्वांची माहिती पुढील प्रमाणे आहेत.
लेक लाडकी योजनेचे आर्थिक फायदे (Benefits)
- राज्यातील आर्थिक दृष्टता गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलींचे जीवन सुधार होण्यास तसेच त्यांचे शिक्षण पण पूर्ण होण्यास व त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहेत.
- या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यात आली आहे जेने करुण गरीब कुटुंबाला अर्ज करताना कोणताही त्रास होऊ नये.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून दोन महत्वाच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. योजनेचा लाभ घेत असलेली मुलगी ही महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावी. तिचा जन्म महाराष्ट्र राज्या मध्ये असावा, तसेच तिच्या परिवाराकडे पिवळा किंवा केशरी रेशनकार्ड असायला हवे. पांढरे रेशनकार्ड असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजने च्या अंतर्गत प्राप्त झालेली जमाराशी रक्कम मुलींचा बैंक खात्या मध्ये DBT च्या सहाय्याने जमा करता येईल, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे किंवा आर्थिक गैरव्यवहार टाळला जाईल.
- मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिच्या बैंक खात्यात ७५,०००/- रूपये DBT च्या सहाय्याने जमा केली जाईल.
लेक लाडकी योजना २०२४ मधील पात्रता व नियम (Lek Ladaki Yojana 2024)
- सर्वप्रथम योजने च्या अंतर्गत मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
- जे मुली महाराष्ट्र मध्ये राहतील फक्त त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. सोबतच आर्थिक दृष्टता गरीब कुटुंबाचे मुली या लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवू शकते.
- महाराष्ट राज्याच्या बाहेर जे मुली राहतात त्यांना या योजनेचा लाभ नाही दिला जाणार नाही.
- ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबा मध्ये दिनांक ०१ एप्रिल २०२३ रोजी लागू करण्यात आले आहे. योजनेच्या सहाय्य ने भरपूर मुलींचे भविष्याय सुधारणार आहे.
- योजनेच्या लाभ घेण्याकरिता कुटुंबा मध्ये जे सरकारी सेवेत कार्यरत आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
लेक लाडकी योजनेचे आवश्यक कागदपत्रे (Lek Ladaki Yojana 2024)
लेक लाडकी योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली सांगण्यात आले आहेत. परंतु अजून अधिकृतपणे कोण कोणते महत्वाचे कागदपत्रे लागतील अशी माहिती समोर आलेली नाही. तरी शासन नियमानुसार आवश्यक असलेले कागदपत्रांची लिस्ट आल्यानंतर सर्व माहिती अपडेट करण्यात येईल.
- लाभार्थी चा जन्म दाखला
- उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा जास्त नसावा)
- आधार कार्ड
- पालकांचे आधारकार्ड
- बैंक पासबुक
- रेशन कार्ड (पिवळा किंवा केसरी)
- मतदान ओळखपत्र (१८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
- मुली शिक्षण घेत असल्याचा शालेचा दाखला
लेक लाडकी योजने मध्ये नोंदणी कशी करावी (Lek Ladaki Yojana 2024)
या योजने मध्ये नोंदणी कशी करायची? किंवा रजिस्ट्रेशन कसे करायचे हा विचार प्रत्येका चा मनात येते. या बद्दल अधिकृत माहिती शासनाने जारी केलेली नाही. कारण या योजने करता कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन नोंदणी करायची नाही आहे. लेक लाडकी योजने मध्ये ऑफलाइन पद्धति ने फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे या साठी कोणत्याही प्रकारची ऑनलाइन प्रोसेस नाही आहे. सरकार कडून लवकरच ऑनलाइन फॉर्म ची लिंक पुढे अपडेट करण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्वाची अटी (Lek Ladaki Yojana 2024)
राज्याचा २०२३ मधील अर्थसंक्ल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च रोजी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात काही महत्वाच्या अटी घोषणा केल्या आहेत. या अनेक महत्वाच्या घोषणापैकी एक महत्वाची घोषणा म्हणजे ‘लेक लाडकी योजना’ प्रारंभ करणे.
मुलींना आर्थिकदृष्टता सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वतच्या पायावर उभे राहता यावे, आपल्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार प्राप्त व्हावा, या करिता महाराष्ट्र सरकार ने ही योजना आरंभित केली आहे. यात मुलीच्या वयाच्या १८व्या वर्षापर्यंत जवळपास ९८ हजार रुपयांची मदत शासनाकडूनदेण्यात येणार आहे.
अधिक माहिती करिता या पेज ला भेट देत रहा.
लेक लाडकी योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत (Lek Ladaki Yojana 2024)
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात महिला व बाल विकास विभागात जाऊन लेक लाडकी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जा मध्ये विचारले गेले सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागेल.
- आता भरलेला अर्ज सदर कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे लेक लाडकी योजने चा ऑफलाइन फॉर्म प्रक्रिया पूर्ण होईल.
लेक लाडकी योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत (Lek Ladaki Yojana 2024)
- सर्वात आधी लेक लाडकी योजना च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
- वेबसाइट ओपन झाल्यावर होम पेज वर लेक लाडकी योजना वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज उघडेल, त्यामध्ये अर्जदाराची विचारलेली सर्व माहिती सोबत जोडावी लागेल व लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
- शेवटी अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज पद्धति पूर्ण होईल. (लेक लाडकी योजनेची अधिकृत मार्गदर्शक तत्व आणि अर्ज प्रक्रिया लवकरच प्रसिद्ध केली जाईल.)
‘लेक लाडकी’ या योजनेत मुलीच्या जन्मांनंतर ५ हजार, इयत्ता पहिलीत ४ हजार, इयत्ता सहावीत ६ हजार, अकरावीत ८ हजार रूपये तर मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रूपये रोख देण्यात येणार आहेत. सरकार ने मांडलेल्या या अर्थसंकल्पात मुलीसाठी खूप छान असे पाऊल उचलेले आहे. जेणेकरून मुलींना आर्थिक उच्चता गाठता येईल व पुढील शिक्षण घेण्यासाठी खूप मदत होईल. अशा प्रकारे लेक लाडकी योजना बद्दल सर्व माहिती स्पष्ट सांगण्यात आलेली आहे. ज्यांना या योजने मध्ये अर्ज करायचा आहे ते आपल्या जवळ च्या आंगनवाडी येथे माहिती विचारू शकता.